पुणे:- आंबेगांव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या सुमारे २५८ लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी पिकांची लागवड करण्याच्या प्रकल्पास शासनाने मान्यता दिली आहे.
या शेतकऱ्यांना इतर सर्व साहित्य घेण्यासाठी एकूण १ कोटी २० लाख ७४ हजार ४०० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आंबेगांव तालुक्यातील आदिवासी शेतकरी यंदा स्ट्रॉबेरीची शेती फुलविणार आहे. करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा अधिक्षक कृषी लयाने आंबेगांव तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्ट्रॉबेरी प्रकल्प राबविण्यासाठीचा प्रस्ताव नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयास दिला होता. त्यामध्ये एकात्मिक आदिवासी प्रकल्प घोडेगांवअंतर्गत (ता. आंबेगांव, जि. पुणे) अनुसूचित जमातीच्या एकूण २५८ लाभार्थी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पिकांच्या लागवडीचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रकल्पामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनमानात होणाऱ्या बदलावर आदिवासी आयुक्त शासनास अहवाल सादर करणार आहेत.
लागवड साहित्यासाठी रक्कम मिळणार
शासनाने या प्रकल्पासाठी अटी व शर्ती निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार योजनेसाठी निवड करण्यात येणारे लाभार्थी हे अनूसूचित जमातीचे असावेत. संबंधित लाभार्थीनी यापूर्वी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नसावा. प्रति लाभार्थी शेतकऱ्याचा खर्च ४६ हजार ८०० रुपये आहे. तसेच खर्चामध्ये प्रति लाभार्थी सहभाग एकूण प्रकल्पाच्या १५ टक्क्यांप्रमाणे १८ लाख ११ हजार १६० रुपये आहे. तर खर्चात प्रति लाभार्थी शासकीय अर्थसहाय्य हे ८५ टक्क्यांप्रमाणे २५८ लाभार्थ्यांसाठी १ कोटी २ लाख ६३ हजार २४० रुपये शासनाने मंजूर केलेले आहे.
संजय काचोळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीआंबेगाव भिमाशंकर साम्य आहे. त्या वातावरणात स्ट्रॉबेरीचे पीक हमखास हाती येण्याची अपेक्षा असून या भागातील आदिवासी शेतकऱ्यांना उपजीवीकेचे चांगले साधन या शेतीतून होईल. म्हणून आदिवासी विकास विभागास प्रस्ताव पाठविण्यात आला. पाच गुंठे जागेच्या प्रकल्पात स्ट्रॉबेरीची रोपे, लागवड साहित्य, ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर आदी साहित्य शेतकऱ्यांना योजनेतून देण्यात येईल. त्यासाठीचे मार्गदर्शनही कृषी विभागाकडून वेळोवेळी करण्यात येईल.