रत्नागिरी:- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे, अशा राज्यातील ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४ हजार ६७० लाख रुपये रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ५०३ शेतकऱ्यांना १३३. लाख रकमेचा लाभ देण्यात आला आहे.
या प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे शासनाच्या ऑगस्ट २०२४ मध्ये निदर्शनास आले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना रुपये ५० हजारापर्यंतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नव्हता. या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी १२ ऑगस्ट २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४६.७० कोटी रुपयांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम १ ऑक्टोबर २०२४ रोजी वर्ग करण्यात आली आहे.
तसेच जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मृत झाले आहेत अशा शेतकऱ्यांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण व योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ५०३ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ
Leave a comment
Leave a comment