लसुन हा एक प्रमुख असा पदार्थ असून दररोजच्या वापरासाठी प्रत्येक घरामध्ये लसणाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो व स्वयंपाक घरातील एक आवश्यक पदार्थ म्हणून देखील लसणाकडे पाहिले जाते.
सध्या जर आपण लसणाचे बाजारभाव बघितले तर ते अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्याचे चित्र असून किरकोळ बाजारांमध्ये अगदी 200 ते 300 रुपये प्रति किलो दराने लसूण विक्री होत आहे.
तसे पाहायला गेले तर बरेच शेतकरी शेतामध्ये घरासाठी म्हणून इतक्या प्रमाणात लसणाची लागवड करतात. परंतु आता देशात बऱ्याच राज्यांतील शेतकरी हे लसणाची लागवड शास्त्रीय पद्धतीने करून व्यावसायिक दृष्टिकोनातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
लसणाची जर शास्त्रीय पद्धतीने व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड केली तर शेतकऱ्यांसाठी लसूण लागवड फायद्याची ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला देखील जर व्यवसायिक दृष्टिकोनातून लसूण शेती करायची असेल तर चांगले उत्पादन मिळवण्यासाठी दर्जेदार आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वानांची लागवड करणे गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण लसणाच्या काही महत्त्वाच्या वाणाची माहिती घेणार आहोत.
हीआहेतलसणाचीटॉपवाण
1- आयसी 42891- लसणाची ही सुधारित जात भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली असून ती हेक्टरी 175 ते 200 क्विंटल उत्पादन देण्यास सक्षम आहे. लसणाच्या या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लागवडीनंतर साधारणपणे 160 ते 180 दिवसांमध्ये काढणीस तयार होते.
लसणाच्या सामान्य रोगांपासून देखील या जातीच्या लसणाचे संरक्षण होते व पिकाचे नुकसान कमी होऊन उत्पादन वाढते. तसेच या जातीच्या लसणाचा दर्जा देखील चांगला असतो व तो बराच कालावधीपर्यंत टिकतो.
2- ऍग्रीफाउंडलसुन( पांढरालसणाचावाण)- लसणाचा हा वाण इतर वानांपेक्षा जास्त उत्पादन देण्यासाठी सक्षम आहे. याचे प्रती हेक्टरी 130 ते 140 क्विंटल उत्पादन मिळते. तसेच ही जात लसणावरील जांभळ्या डाग आणि ब्लाईट रोगाला प्रतिरोधक आहे.
महत्त्वाचे म्हणजे लसणाच्या या जातीचे गड्डे टणक तसेच मध्यम आकाराचे आणि पांढरे असतात. तसेच क्रिम रंगाची साल असते. लागवडीनंतर दीडशे ते 160 दिवसात काढणीस तयार होतो. साधारणपणे लसणाची ही जात महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक राज्यांमध्ये लागवडीस योग्य आहे.
3- यमुनापांढरालसुन– लसणाची ही जात देखील उत्पादनाच्या बाबतीत सरस असून हेक्टरी 130 ते 175 क्विंटल उत्पादन मिळते. ही जात पांढरे ठिपके आणि जांभळे डाग यासारख्या रोगांना प्रतिरोधक आहे. भारतातील बहुतेक भागांमध्ये लागवडीस उपयुक्त अशी जात असून विविध हवामान परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम आहे.
लसणाच्या या जातीच्या पाकळ्या मोठ्या आणि मजबूत असतात व बाजारात देखील याला चांगला दर मिळतो. तसेच रोग कमी येत असल्यामुळे कीटकनाशकांवरचा खर्च कमी होऊ शेतकऱ्यांच्या पैशात बचत होते.
4- भीमाओंकार– या लसणाच्या वाणाच्या पाकळ्या आकाराने खूप मोठ्या असतात व त्यांचा रंग पांढरा शुभ्र असतो. हेक्टरी खूप चांगले उत्पादन देण्यास हा वाण सक्षम आहे.
या लसणाची चव तिखट आणि सुगंधी असते व उच्च उत्पादन आणि आकर्षक स्वरूपामुळे व्यावसायिक लागवडीसाठी लसणाचा हा वाण उत्तम ठरतो. मोठ्या पाकळ्या असल्यामुळे घरगुती वापरासाठी देखील योग्य असतो व बाजारात याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. लागवडीनंतर साधारणपणे 120 ते 135 दिवसात काढणीस तयार होतो.