बंदिस्त गुरांचे खूर घासत नाहीत परिणामी त्यांच्यामध्ये चालण्यासोबतच उभे राहण्याची समस्या निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर राज्यात शास्त्रोक्त पद्धतीने खूर कापणीसाठी हूप ट्रिमरची उपलब्धता व्हावी, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे.
हूप ट्रिमरचे दर हे काही लाखांच्या घरात असल्याने अनुदानावर हे यंत्र उपलब्धतेची मागणीदेखील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केली आहे.
राज्यात गोवंशीय जनावरांची संख्या सुमारे १३९.९२ लाख आहे. देशी गोवंशाला चरण्यासाठी बाहेर सोडले जाते. त्यामुळे त्यांच्या खुरांची झीज होते. परिणामी, त्यांमध्ये उभे राहण्यासोबतच चालण्याची समस्या निर्माण होत नाही. एच.एफ. तसेच इतर गायी किंवा बंदिस्त गोपालन असलेल्या ठिकाणच्या जनावरांमध्ये त्यांचे खूर (नखी) वाढतात. परिणामी, त्यांना चालण्यात अडचण निर्माण होते. त्या लंगडतात सोबतच उभे राहता येत नाही.
Animal Care: जनावरांमधील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी असा आहार द्या
त्यामुळे पंजाबमध्ये पशुपालकांना तंत्रशुद्ध पद्धतीने खूर कापता यावे याकरिता खासगी कंपन्यांच्या माध्यमातून थेट विदेशात प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. निमगाव जाळी (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) येथील रामनाथ वदक यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या झेप शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांकडे सुमारे एक हजार जनावरे आहेत. जनावरे जागेवर बांधलेली असल्याने दरवर्षी त्यांची खूरसाळणी करावी लागते. खासगी व्यक्तीच्या माध्यमातून हे काम होते.
त्यावर प्रति जनावर दरवर्षी ५०० रुपयांप्रमाणे खर्च होतो. खूरसाळणीसाठी असलेले हूप ट्रिमर अडीच ते पावणेतीन लाख रुपयांत आहे. राज्य शासनाकडून अनुदानावर त्याची उपलब्धता झाल्यास राज्यातील हजारो पशुपालकांना त्याचा उपयोग करणे शक्य होणार आहे. सध्या राज्यात पशुसंवर्धन विभागाकडून अशाप्रकारची सायंटीफित यंत्रणाच नाही. पशुसंवर्धन विभागाकडे अशी यंत्रणा असल्यास त्यांच्या माध्यमातूनही पशुपालकांना उपलब्धता करून देणे शक्य होईल.
– डॉ. रामदास गाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनाजनावर फिरल्याने खुराची झीज होते. जागेवर बांधलेल्या जनावरांमध्ये समस्या निर्माण होतात. जनावरे लंगडतात. त्यामुळे तंत्रशुद्ध पद्धतीने खूर कापण्याची सुविधा असावी. राज्यात काही व्यक्ती अशा सेवा देतात. अनुदानावर हे सयंत्र उपलब्ध झाल्यास गावस्तरावर रोजगार निर्मिती साध्य होणार आहे.- डॉ. रत्नाकर राऊळकर, सहायक प्राध्यापक, स्नातकोत्तर पशवैद्यक व पशुविज्ञान संस्था, ‘माफसू’ खुरामुळे जखम झाल्यास अल्सर होण्याची भीती राहते. चामडी व खूरमधील भागात कोरोनायटीस आजार होतो व खूर गळून पडण्याची शक्यता राहते. खुराची लांबी ७.५ सेंटिमीटर ही स्टॅंडर्ड आहे. त्यापेक्षा अधिक लांबी वाढल्यास जनावरांना वजन पेलने असह्य होते. सध्या खूर घासण्यासाठीची इलेक्ट्रॉनिक ट्रिमर आले आहे. त्याची किंमत काही हजारांत आहे. परंतु या आजारासंदर्भाने जागृती वाढविली पाहिजे. – रामनाथ वदक, संचालक, झेप शेतकरी उत्पादक कंपनी, निमगाव जाळी, ता. संगमनेर, जि. अहमदनगरआमच्या शेतकरी कंपनीच्या सभासदांकडे एक हजारावर जनावरे आहेत. दरवर्षी ५०० रुपये प्रमाणे प्रति जनावर खूर कापणीवर खर्च होतो. पशुसंवर्धन विभागामार्फत ही सुविधा किंवा हूप ट्रिमर अनुदानावर मिळाल्यास राज्यातील लक्षावधी पशुपालकांना फायदा होणार आहे.