राजापूर/ तुषार पाचलकर: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा राजापूर तालुका बार असोशिएशनच्या वतीने मंगळवारी जाहिर निषेध करण्यात आला. राजापूर न्यायालयाच्या बाहेर प्रवेशद्वारावर राजापूर तालुका बार असोशिएशनच्या वतीने या कृत्याचा जाहिर निषेध करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात बुट फेकण्याचा दुदैवी प्रकार सोमवारी घडला. याचे तीव्र पडसात देशभरात उमटले आहेत. या कृत्याचा सर्वत्र जाहिर निषेध केला जात आहे. राजापूर तालुका बार असोशिएशनच्या वतीनेही मंगळवारी राजापूर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्रित येत सर्व वकिलांनी या कृत्याचा जाहिर निषेध केला. राजापूर तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येत बार कौन्सीलने या भ्याड हल्त्याचा जाहिर निषेध केला.
याप्रसंगी अड. विलास कुवळेकर, अॅड. सुरेश सिनकर, अॅड. मिलींद चव्हाण, अॅड. यशवंत कावतकर, चंद्रशेखर अभ्यंकर, अॅड. सुनिल मेस्त्री, अॅड. राहुल राणे, अॅड. सुनैना देसाई, अड. तेजस्वीनी राणे, अॅड. सुशांत पवार, अॅड. समिर कुंटे, अॅड. प्रकाश सातोपे, अॅड. प्रविण नागरेकर, अॅड. तावडे, अॅड. अविनाश कुवेसकर, अॅड. तन्मय सिनकर, अड. प्रतिभा शेट्ये, अॅड. विलास पळसमकर, अॅड. स्वाती गोरले, तसेच दिवाकर आडविरकर, मेहेश माटल आदी उपस्थित होते.
राजापूर तालुका बार असोसिएशनच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध
