जागतिक योग दिनानिमित्त उद्या खेडमध्ये भव्य योग प्रशिक्षण शिबिर; ॲड. वैभव खेडेकर यांची संकल्पना

Gramin Varta
31 Views

खेड: उद्या २१ जून रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून खेड शहरात भव्य योग प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निरोगी जीवनशैलीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सकाळी ७.०० वाजता प्रबोधनकार ठाकरे उद्यान, खेड येथे सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

या विशेष कार्यक्रमासाठी योग मार्गदर्शिका डॉ. सौ. वैष्णवी विक्रांत पाटील यांच्यासह जागतिक योग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या कु. तन्वी भूषण रेडीज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक स्तरावर जी नवी ओळख मिळवून दिली आहे, त्यातून प्रेरणा घेऊन समाजाच्या आरोग्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. याद्वारे निरोगी समाजनिर्मितीस हातभार लावण्याचा उद्देश आहे. तरी या कार्यक्रमात खेड शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *