वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समितीवर प्रभाकर सावंत यांची नियुक्ती

Gramin Varta
45 Views

चिपळूण : तालुक्यातील तोंडली गावचे रहिवासी प्रभाकर धोंडू सावंत यांची वहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हा परिषद सदस्या आणि जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा सौ. शिवानीताई संदीप सावंत यांच्या शिफारशीनुसार तसेच चिपळूणच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. प्रभाकर सावंत यांचा समाजकार्यातील सक्रिय सहभाग, जनहिताची बांधिलकी आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही निवड झाली आहे.

या नवीन जबाबदारीच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन केले जात असून, त्यांच्या आगामी लोकहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *