GRAMIN SEARCH BANNER

करबुडे बोगद्यात आढळला 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह, ओळख पटवण्याचे आवाहन

Gramin Varta
41 Views

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील करबुडे बोगद्यामध्ये मंगळवारी सकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृताचे वय अंदाजे 35 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट रोजी सकाळी करबुडे बोगद्यात एक इसम पडल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळाली. तात्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3369675
Share This Article