GRAMIN SEARCH BANNER

खेड: हुझेफा जमादारचे दहावीत घवघवीत यश; एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या यशात मानाचा तुरा

Gramin Varta
33 Views

संगलट (खेड) : खेड तालुक्यातील प्रख्यात एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून संगलट गावातील विद्यार्थी हुझेफा फैसल जमादार याने ७६.४० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे शाळेसह संगलट गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हुझेफा हा संगलट येथील ज्येष्ठ पत्रकार इक्बाल जमादार यांचा नातू असून लहानपणापासूनच अभ्यासू आणि मेहनती विद्यार्थी म्हणून त्याची ओळख आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा पाठिंबा यांच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. आपल्या यशाचे श्रेय शिक्षक तसेच आजोबांच्या मार्गदर्शनाला असल्याचे हुझेफा जमादार याने सांगितले.

हुझेफाच्या या यशाबद्दल एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षकवृंद, मित्रपरिवार तसेच संगलट गावातील ग्रामस्थांकडून त्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून भविष्यातही तो अशाच प्रकारे यशाची उंच शिखरे गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Total Visitor Counter

3369833
Share This Article