GRAMIN SEARCH BANNER

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन

Gramin Varta
1 View

मुंबई: सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी गाजलेल्या चित्रपट गीतांचा व भावगीतांचा बहारदार कार्यक्रम दिवाळी पहाट आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनातून साकारत आहे.

दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 6.30 वाजता साहित्य संघ गिरगाव मुंबई येथील कार्यक्रमात गाजलेल्या चित्रपट गीतांचा व भावगीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी सादर होणार आहे. ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर, सोनाली कर्णिक, दत्तात्रय मेस्त्री, अभिषेक नलावडे, धनश्री देशपांडे संगीत संयोजन अमित गोठीवरेकर हे करणार आहेत तर निवेदन अमित काकडे करतील. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

Total Visitor Counter

2671735
Share This Article