पुणे: २३ जूनपासूनच शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर आता शाळांच्या वर्षभरातील सुट्ट्यांची यादीदेखील जाहीर झाली आहे. राज्यातील सर्व शाळांना एकूण १२८ दिवस सुट्ट्या असणार आहे.
यामध्ये सणवार आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या समावेश आहे. रविवारच्या सुट्ट्यांचादेखील यात समावेश आहे.
जिल्हा परिषदेची शाळा सकाळी साडेदहा वाता भरणार आहे आणि संध्याकाळी ५ वाजता सुटणार आहे. तर अर्धवेळीची शाळा नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे. शाळेच्या दिवशी ६० मिनिटांची सुट्टी असणार आहे. तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात १०-१० मिनिटांच्या दोन सुट्ट्या असणार आहे.
अश्या आहेत वर्षभरातील सुट्ट्या
जुलै : आषाढी एकदशी, मोहर्रम, नागपंचमी
ऑगस्ट : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी
सप्टेंबर : गौरी विसर्जन, ईद-ए- मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना
ऑक्टोबर : गांधी जयंती आणि दिवाळी
नोव्हेंबर : गुरूनानक जयंती
डिसेंबर : ख्रिसमस- नाताळ
जानेवारी : मकरसंक्रांती, शब्बे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी : शब्बे-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती
मार्च : धुलिवंदन, रंगपंचमी, शब्बे-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती
एप्रिल : गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
मे : महाराष्ट्र दिन, उन्हाळा सुट्टी
यंदा शाळांना १२८ दिवस सुट्ट्या; शिक्षण विभागाने केली यादी जाहीर

Leave a Comment
Leave a Comment