खेड : तालुक्यातील कोरेगाव-बेलवाडी येथे पेट्रोल अंगावर ओतून घेत स्वतःला पेटवून घेतलेल्या रवींद्र बाळकृष्ण शिंदे (वय 48) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुरेश शिंदे यांनी खेड पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, रविंद्र शिंदे यांनी घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना मानसिक स्थिती बिघडल्याने पेट्रोल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. गंभीर भाजल्यामुळे त्यांना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना संगमेश्वर परिसरात त्यांचा मृत्यू झाला. खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणाची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खेडमध्ये पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू
