ग्रामस्थांनी मानले आमदार शेखर निकम यांचे आभार
संगमेश्वर / प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील कडवई वाणीवाडी , बाजारपेठ, समर्थनगर येथील स्मशानभूमी कडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने पाण्यातून कराव्या लागणाऱ्या खडतर प्रवासावर चार दिवसांपूर्वी समाज माध्यमातून प्रकाश टाकला होता. याची तात्काळ दखल घेत आमदार शेखर निकम यांनी येथील ग्रामस्थांची एक बैठक आयोजित करत दुसऱ्याच दिवशी सदर रस्ताव व साकवाचे अंदाजपत्रक करण्याचे आदेश जिल्हापरिषद बांधकाम विभागाला दिले . त्याप्रमाणे आज सदर कामाची पहाणी करून अंदाजपत्रकाची प्रक्रिया सुरू झाली . त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आमदार निकम यांचे आभार असून लवकरच ही समस्या दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे .
कडवई वाणीवाडी , बाजारपेठ व समर्थनगर याना अंत्यविधीसाठी असणाऱ्या स्मशानभूमी कडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने गेली साठ वर्षे येथील ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यामध्ये नदीच्या पाण्यातून शव नेताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे . यावर समाज माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला होता .
याची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी उपसरपंच दत्ताराम ओकटे याना समबंधित ग्रामस्थांची तात्काळ बैठक आयोजित करण्याचे सांगितले . त्याप्रमाणे दिन दिवसांपूर्वी कडवई हनुमानमंदिर येथे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली .यावेळी आमदार निकम यांनी ही समस्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिले .
तात्काळ दुसऱ्याच दिवशी सदर कामाची पाहणी करून अंदाजपत्रक सादर करण्याचे आश्वासन आमदार निकम यांनी जिल्हापरिषद बांधकाम विभागाला दिले . त्यानुसार आज जिल्हापरिषद बांधकाम विभागाचे अभियंता ओंकार कुंभार व देशपांडे यांच्या उपस्थितीत या जागेची पहाणी करण्यात आली .लवकरच या कामाचे अंदाजपत्रक तयार करून ते मंजुरीसाठी पाठवण्यात येईल व ही समस्या सोडविली जाईल अशी माहिती यावेळी राष्ट्रवादी चे नेते व आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे यांनी ग्रामस्थांना दिली .यावेळी कडवई उपसरपंच दत्ताराम ओकटे , आमदार निकम यांचे स्वीयसहायक संजय कदम , माजी सरपंच संदेश सागवेकर ,वरदान क्रीडामंडळाचे अध्यक्ष प्रवीण प्रसादे,अमित खातू , मयूर लिंबूकर ,भगवान नारकर ,मुस्ताक सावंत ,आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
फोटो .स्मशानभूमी कामाची पाहणी करताना ग्रामस्थ व अधिकारी