GRAMIN SEARCH BANNER

शाखाप्रमुख म्हणजेच शिवसेनेचा कणा : आमदार भास्करराव जाधव चिपळूण येथे शिवसेना उबाठा शाखा प्रमुखांचा मेळावा संपन्न

चिपळूण: चिपळूणमधील बांदल हायस्कूल येथे झालेल्या भव्य मार्गदर्शन मेळाव्यात माननीय आमदार भास्करशेठ जाधव यांनी आपल्या आक्रमक शैलीत बाळासाहेबांना अपेक्षित असणारा शाखाप्रमुख कसा असावा याचे थेट मार्गदर्शन केले.

शाखा ही शिवसेनेची जीवनवाहिनी आहे आणि शाखाप्रमुख ही संघटनेची खरी ताकद आहे, हे अधोरेखित करत भास्करशेठ जाधव यांनी शाखाप्रमुखांच्या अधिकार, कर्तव्य आणि जबाबदारीवर थेट भाष्य केले. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते व माजी आमदार बाळासाहेब माने, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा समन्वयक रवी डोळस, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, महिला उपजिल्हा संघटिका सौ. धनश्री शिंदे, महिला क्षेत्राध्यक्षा सौ. रुमा देवळेकर, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, तालुका संघटक राजू देवळेकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख मानसी भोसले, शहर महिला संघटक वैशाली शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका प्रमुख बळीराम गुजर यांच्या कामगिरीचे भास्करशेठनी विशेष कौतुक केले तसेच उपस्थित शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांनी आपली मनोगत व्यक्त केलीत. आ. भास्करशेठ जाधव यांचे ज्वलंत भाषण, शाखाप्रमुखांचा उत्साह आणि शिवसैनिकांची निष्ठा यामुळे हा मेळावा संघटनेच्या बळकटीचा नवा टप्पा ठरला.

Total Visitor Counter

2475026
Share This Article