GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : पेठकिल्ला येथे तरुणाची भाऊ, भावजयला मारहाण

Gramin Varta
218 Views

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून भाऊ व भावजय यांना मारहाण झाल्याची घटना शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत पवीण पंढरीनाथ विलणकर आणि पर्णिका पवीण विलणकर (वय ५१, रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत.

या प्रकरणी पर्णिका विलणकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार १३ डिसेंबर रोजी रात्री त्या आपल्या घरासमोर कुत्र्यांना अन्न देत होत्या. त्यावेळी नितीन पंढरीनाथ विलणकर (वय ५२, रा. पेठकिल्ला) तेथे आला. कुत्र्यांना अन्न दिल्यामुळे कुत्रे त्रास देतात, असे म्हणत त्याने वाद घातला.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी नितीन विलणकर याने काठीने भाऊ पवीण विलणकर व भावजय पर्णिका यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शहर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे नितीन विलणकर याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3379938
Share This Article