दापोली : हर्णे बंदरातील मच्छीमारांच्या पहिल्याच खेपेत जाळ्यात पापलेटचे घबाड मिळाले आहे. मच्छीमारांसाठी ही दिलासादायक बाब आहे. दरम्यान, पापलेटची आवक अशीच कायम राहण्याची अपेक्षा येथील मच्छीमार व्यक्त करत आहेत.देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी हंगामाला सुरुवात झाली आहे.
समुद्री वातावरण शांत असल्याने यंदा हर्णे बंदरातील मच्छीमारांनी 1 ऑगस्टचा शुभारंभाचा मुहूर्त साधला आहे. बहुतांश नौकांनी हर्णे बंदरातून मासेमारीला सुरुवात केली आहे. त्यापैकी काही नौका किनार्यावर मासळी घेऊन आल्या असून, या मच्छीमारांनी पापलेटची पहिली पलटी आणलेली होती. नवीन हंगामातील सुरुवातीकडे येथील सर्वच मच्छीमारांचे लक्ष लागून होते.
दापोली: मासेमारी हंगामात जाळ्यात पापलेटचे घबाड!
