कोत्रेवाडी ग्रामस्थांचे तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
लांजा : कोण म्हणतो रद्द करणार नाय, केल्याशिवाय राहणार नाही.. रद्द करा रद्द करा, डम्पिंग ग्राउंड रद्द करा.. अशा घोषणा देत गुरुवारी सकाळपासून कोत्रेवाडी ग्रामस्थांनी लांजा शहर परिसर दणाणून सोडला. लांजा नगर पंचायतीच्या डम्पिंग ग्राउंड विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण १४ ऑगस्ट पासून सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. तरीही ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत डंपिंग ग्राउड प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असा ठाम निर्धार ग्रामस्थानी केला आहे.
लांजा नगरपंचायतीने मनमानी कारभार करून डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी लांजा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले आहे. या बेमुदत उपोषणाचा गुरुवार पहिला दिवस, गुरुवारी दिवसभर सकाळपासून पावसाने जोर केला असला तरीही कोत्रेवाडी ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतलेले नाही.
दरम्यान, आमची वाडी उध्वस्त करणारा डम्पिंग ग्राउंड प्रकल्प हद्दपार होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आम्ही मागे हटणार नाही .असा निर्धार देखील कोत्रेवाडी ग्रामस्थांनी केला आहे .या उपोषणात कोत्रेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
रद्द करा रद्द करा, डम्पिंग ग्राउंड रद्द करा, लांजा शहर दणाणले
