सचिन यादव / धामणी
कडवई उजगावकरवाडी (ता. संगमेश्वर) येथील सचिन उजगावकर हे गेली २६ वर्षे लोककलेच्या माध्यमातून समाजसेवा आणि समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत चिपळूण येथील कलगीतुरा उन्नती मंडळ यांच्या वतीने त्यांना यंदाचा “प्रेरणा शाहीरी पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार येत्या रविवारी एका विशेष कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
लोककला, शाहिरी, आणि सामाजिक विषयांवरील सादरीकरणांद्वारे त्यांनी ग्रामीण भागात जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. व्यसनमुक्ती, स्त्रीशिक्षण, पर्यावरण, भ्रष्टाचारविरोधी चळवळी यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी सातत्याने शाहिरीच्या माध्यमातून प्रभावी संदेश पोहोचवले आहेत.
या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळेल, तसेच युवकांमध्ये लोककलेविषयी आकर्षण निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.
कडवई उजगावकरवाडीतील सचिन उजगावकर यांना “प्रेरणा शाहीरी पुरस्कार”
