GRAMIN SEARCH BANNER

उत्तराखंड: ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता

उत्तराखंड: उत्तरकाशीमध्ये मंगळवारी दुपारी ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता झाले आहेत. या ढगफुटीचा फटका लष्करालाही बसला आहे.

लष्कराच्या हर्षिल येथील तळापासून सुमारे ४ किमी अंतरावर असलेल्या धराली गावामध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात विद्ध्वंस झाला आहे. तर या ढगफुटीमुळे एक हेलिपॅड वाहून गेला आहे. हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही या ढगफुटीचा फटका बसला आहे. तसेच लष्कराने अनेक जवानही दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत.

ढगफुटीमुळे आलेल्या पाणी आणि चिखलाच्या पुरामुले गंगोत्री धामशी रस्त्यांमार्गे असलेला संपर्क तुटला आहे. ढगफुटीमुळे खीर गंगा नदीला पूर आला. खीर गंगा नदी ही हरी शिला पर्तावरील सात ताल परिसरातून वाहत येते. तिथेच ढगफुटीची ही घटना घडली आहे. या नदीच्या उजव्या भागात धरालीचा परिसर आहे. तर डाव्या बाजूला हर्षिल येथील तेल गाट येथे लष्कराचा तळ आहे.

या लष्कराच्या तळालाही ढगफुटीमुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे. येथील अनेक जवान बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हर्षिल येथे लष्कराची १४ राजरिफ यूनिट तैनात आहे. याशिवाय उत्तरकाशीपासून १८ किमी दूर अंतरावर असलेल्या नेतला येथे भूस्खलन झाल्याने धराली येथे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच हर्षिल येथे नदीकिनारी बांधण्यात आलेला हेलिपॅड वाहून गेला आहे.

Total Visitor Counter

2455606
Share This Article