रत्नागिरी :जिल्हा परिषद शाळा, आदर्श वसाहत, कारवांची वाडी नं. २ (तालुका व जिल्हा रत्नागिरी) येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कु. अजिंक्य किशन बुट्टे याने मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर १० वा आणि जिल्हास्तरावर ५ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अजिंक्यच्या यशामागे त्याची चिकाटी, नियमित परिश्रम आणि मार्गदर्शक शिक्षिका सौ. रेणुका उपाध्याय यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता सावंत यांचे प्रोत्साहन व सहकार्यही या यशात महत्त्वाचे ठरले.
मंथन शिष्यवृत्ती परीक्षा ही राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठेची मानली जाते. अशा परीक्षेत मिळवलेले हे यश रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.
अजिंक्यच्या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून गावात आनंदाचे वातावरण आहे. शाळा प्रशासन, शिक्षकवृंद आणि पालकांनी त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरीतील अजिंक्य बुट्टे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहावा, जिल्ह्यात पाचवा
