राजापूर : आजच्या मोबाईलच्या युगात गणेशोत्सवाचा हरवलेला उत्साह पुन्हा अनुभविण्यासाठी राजापूर शहरातील ए वन मित्रमंडळाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाडीतील व वाडीबाहेरील गणपती बाप्पांचे घरोघरी दर्शन घेत जुना आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पूर्वी लोक गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी एकमेकांकडे जात असत. त्यामुळे आपापसातील नाती घट्ट राहत आणि समाजातील एकोपा वाढत असे. परंतु आजच्या मोबाईलच्या धकाधकीच्या युगात प्रत्येक जण आप-आपल्या घरापुरताच उत्सव साजरा करतो. हाच हरवलेला उत्सवातील आत्मीयतेचा भाव पुन्हा जागवण्यासाठी ए वन मित्रमंडळाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
मंडळातील सदस्यांनी ठरवले की वाडीतील तसेच वाडीबाहेरील गणपती बाप्पांचे घरोघरी जाऊन दर्शन घ्यायचे. या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले असून, जेष्ठ मंडळींना जुन्या काळातील दिवसांची गोड आठवण झाली.
राजापुरातील ए वन मित्रमंडळाचा अनोखा उपक्रम
