गटार साफ करण्यासाठी आलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना अटकाव, दोन व्यावसायिकांमध्ये वाद
चिपळूण : चिपळूण बाजारपेठेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाजारपेठेतील एक इमारत चक्क गटारांवर उभी असल्याचे बुधवारी दिसून आले. दोन दुकानामध्ये असलेला कचरा काढण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी आले असताना त्यांना अटकाव करण्यात आला. यावरून दोन व्यावसायिकांमध्ये वादही झाला. मात्र समोरच्या गटारावर असलेल्या लोखंडी प्लेट काढल्यानंतर ही इमारत गटारांवर उभी असल्यो स्पष्ट झाले. ही इमारत काही वर्षापूर्वी नव्याने उभारण्यात आली आहे. त्यामुळे आता नगर परिषद याबाबत काय भूमिका घेते याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बाजारपेठेतील गटारे लहान असली तरी पूर्वी त्यातूनच पावसाच्या पाण्याचा निचरा सहज होत होता. असे असताना काही वर्षापूर्वी बाजारपेठेत अनेक इमारती नाले बूजवून, नाल्यांवर, गटारांवर उभ्या राहिल्या आहेत. याला काही लोकप्रतिनिधी व तत्कालीन अधिकारी यां आशीर्वाद होता, असे आजही त्यो साक्षीदार असलेले अनेक व्यावसायिक सहजपणे सांगतात. अशा बेकायदा इमारतींमुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या 4 वर्षांपासून तर बाजारपेठेच्या मध्यावर असलेल्या व गटारांवर उभ्या राहिलेल्या इमारतीमुळे पाणी अन्य दुकानदारांच्या दुकानांमध्ये शिरत आहे.
चिपळुणात धक्कादायक प्रकार ; चक्क गटारांवर उभी आहे इमारत
