GRAMIN SEARCH BANNER

खेड : विनंती ऑरगॅनिक्स कंपनीत कामगाराच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा

Gramin Varta
10 Views

कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका

खेड : लोटे एमआयडीसीमधील विनंती ऑरगॅनिक्स लिमिटेड या कंपनीत घडलेल्या भीषण अपघातात समिर कृष्णा खेडेकर (वय ३९, रा. घाणेखुंट गवळीवाडी, ता. खेड) या कामगाराचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेला कंपनीच्या व्यवस्थापनाची निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या बाबतीत दाखवलेली दुर्लक्ष कारणीभूत ठरल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद सराफ, महादेव महिमान, सुरेंद्र जाधव व जयंत भगत (सर्व रा. विनती कॉलनी, धामणदेवी, ता. खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सचिन मधुकर गवळी (वय ४५, रा. घाणेखुंट गवळीवाडी) यांनी दिली. या प्रकरणी कंपनीच्या मालकांपासून ते प्लॉट इंचार्जपर्यंत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी कामगार संघटनांकडून होत आहे.

मयत समिर कृष्णा खेडेकर हे आयसो ब्यूटिल प्लॉट येथे काम करत असताना थरमिक फ्लुइड हिटरच्या हवेच्या दाबामुळे एअर प्री-हिटरच्या केसिंगचा पत्रा फुटून थेट त्यांच्या डोक्याला लागला. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हा प्रकार गुरुवारी (दि. २६ जुलै) सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास घडला. विशेष म्हणजे, कंपनीच्या व्यवस्थापनाने कोणतीही सुरक्षात्मक साधने, यंत्रणा अथवा उपाययोजना उपलब्ध करून न देता कामगाऱ्यांना धोकादायक परिस्थितीत कामाला लावल्याचा आरोप सचिन गवळी यांनी केला आहे.

या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात विनोद सराफ, महादेव महिमान, सुरेंद्र जाधव व जयंत भगत (सर्व रा. विनती कॉलनी, धामणदेवी, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

या घटनेनंतर लोटे एमआयडीसीमधील औद्योगिक सुरक्षेच्या पातळीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकाराकडे संबंधित प्रशासन आणि कामगार विभाग गंभीर दखल घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2647809
Share This Article