GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : अंगणात चालत असताना पडून जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Search
23 Views

राजापूर : तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथे घराच्या अंगणात चालत असताना चिखलात पाय घसरून पडल्याने जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रकात यशवंत लोलगे (58, गोठणे दोनिवडे, राजापूर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रकात लोलगे हे 18 जून रोजी दुपारी घराच्या अंगणात चालत असताना पाय घसरून पडले. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना 21 जून रोजी सकाळी 9 वाजता त्यांचे निधन झाले.

Total Visitor Counter

3366866
Share This Article