GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : धामणवणे येथे रविवारी बांधावरचे साहित्य संमेलन

Gramin Varta
52 Views

चिपळूण:  ‘माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास’ असे बोधवाक्य घेऊन राज्यभरातील साहित्य रसिकांसमोर आलेले ‘बांधावरचे संमेलन’ येत्या रविवारी (दि.८) चिपळूणनजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयूराची’ शिवारात होत आहे.शेणाने सारवलेल्या शेताच्या बांधावर दीपप्रज्वलन, सातेरी माता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वारुळांचे पूजन आणि पवित्र गंगेने भरलेल्या मातीच्या घटाचे पूजन, आरज लावून आणि भलरी गाऊन सकाळी ९.४५ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

संमेलन नावनोंदणी आणि अल्पोपाहार सकाळी ९ ते ९.४५ पर्यंत असेल. प्रा. सुहास बारटक्के हे संमेलनाचे अध्यक्ष तर शशिकांत मोदी स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाचे उद्घाटन डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार शेखर निकम, मसाप केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, वाशिष्ठी उद्योग समूहाचे प्रवर्तक प्रशांत यादव उपस्थित असतील. स. ९.४५ ते १०.४५ पर्यंत चालणाऱ्या उद्घाटन सत्रास प्रमुख पाहुणे मसापचे कोकण प्रतिनिधी प्रकाश देशपांडे, कोमसाप जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, केशवसुत स्मारकाचे विश्वस्त गजानन पाटील, स्प्रिंग क्लिनिकचे संचालक डॉ. यतीन जाधव, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईचे अध्यक्ष सुभाष लाड, उपस्थित असतील. उद्घाटन सत्राचे संचालन प्रा. सोनाली खर्चे, धीरज वाटेकर करतील.

पहिले सत्र १०.४५ ते ११.४५ वाजता कविता तंत्र आणि मंत्र या विषयावर होईल. या विषयावरील कार्यशाळा ७५ पेक्षा अधिकवेळा घेणारे अभ्यासक विजय जोशी काव्यविवेचन करतील. सत्रसंचालन मनीषा दामले, प्रकाश घायाळकर पाहातील. ११.४५ ते १२.३० वाजताच्या दुसऱ्या कथाकथन सत्रात सत्र अध्यक्ष सुरेश देशपांडे (मुंबई) प्रमाण मराठी तर उज्ज्वला मांडवकर (संगमेश्वर – संगमेश्वरी बोली), अमोल पालये (रत्नागिरी – तिलोरी बोली), अतुफा होडेकर (रत्नागिरी – कोकणी बोली), ज्ञानेश्वर झगडे (गुहागर – खारवी बोली) सहभागी होतील. सत्रसंचालन संगीता जोशी, विशाखा चितळे, ऋचा भागवत, उमेश घाडगे पाहातील. भोजनानंतरचे तिसरे ‘शेतीची गाणी’ सत्र दु. २ ते ३ या वेळेत होईल. सत्रसंचालन संध्या आठल्ये, विनायक ओक पाहतील. दु. ३.०० ते ३.४५ वाजता चौथे सत्र संमेलनाध्यक्ष प्रा. बारटक्के यांच्या मुलाखतीचे असेल. ही मुलाखत स्नेहल जोशी, मंगेश बापट घेतील. सत्रसंचालन स्नेहल कुलकर्णी, विलास महाडिक पाहतील.

चहापानादरम्यान शाकाहारी मोंगा-पोपटीचा आस्वाद घेता येईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यात राष्ट्रपाल सावंत, कांता कानेटकर, संजय तांबे, मुझफ्फर सय्यद, केदार पाटणकर, मंदार ओक, मेधा लोवलेकर, विशाखा चितळे, अपर्णा नातू (चिपळूण), सुनील कदम, सुदेश मालवणकर (दापोली), विनय माळी (खेड), दिपेश बारस्कर (मुंबई), सहभागी होतील. सूत्रसंचालन कैलास गांधी (दापोली) तर सत्रसंचालन संध्या साठे, अभिजित देशमाने करतील. संमेलनाचा समारोप सायंकाळी ५ वाजता होईल. सत्रसंचालन प्राची जोशी, अंजली बर्वे करतील.

Total Visitor Counter

3387167
Share This Article