रत्नागिरी : शहरातील रा.भा. शिर्के प्रशालेचे सहाय्यक शिक्षक तथा स्काऊट शिक्षक श्री. पी. सी. जाधव यांची राज्यस्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी मा. संचालक कार्यालयामार्फत सन २०१६ ते २० या कालावधीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता १ ते ५ साठी यशस्वीपणे करण्यात आलेली आहे. यातील सकारात्मक अनुभवांच्या आधारे आता राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत मूल्यवर्धन आवृत्ती ३.०या कार्यक्रमाची अंमलबजावणी इ. १ली ते ८वी साठी सन २०३० पर्यंत करण्यात येणार आहे.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार असून या अनुषंगाने सदर राज्यस्तरीय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.३० जून ते ४ जुलै या कालावधीत सदर प्रशिक्षण होणार आहे.भारतीय जैन संघटना, शैक्षणिक पुनर्वसन वाघोली, पुणे याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी (TOT) श्री.पी.सी. जाधव यांची निवड झाल्याबद्दल डायट संस्था प्राचार्य डॉ सुशील शिवलकर प्ना.राजेंद्र लठ्ठे , शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.के.डी.कांबळे यांनी प्रशांत जाधव यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.