GRAMIN SEARCH BANNER

मंडणगड औद्योगिक वसाहतीसाठी जागेचे सर्वेक्षण करा – राज्यमंत्री योगेश कदम

Gramin Varta
26 Views

रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड परिसराच्या औद्योगिक विकासासाठी ‘एमआयडीसी’ ची निर्मिती करणे गरजेचे आहे. या भागात उद्योग येण्यास तयार आहेत. त्यामुळे महामार्गलगत जागेची निश्चिती करून सर्वेक्षण करावे, असे निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिले.

बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे एमआयडीसीचे सह आयुक्त कुणाल खेमनार, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल, क्षेत्रीय अधिकारी वंदना खरमारे तर मंत्रालयात उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, अवर सचिव किरण जाधव उपस्थित होते.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, मंडणगड ‘ एमआयडीसी’ साठी सपाट जमिनीची आवश्यकता आहे. या जमिनीचा शोध घेण्यात यावा. तसेच या व्यतिरिक्त अतिरिक्त १५० एकर जमिनीचे संपादन करावे. आंबवडे गावाच्या महामार्गावर जमीन असल्यास ती घ्यावी. जमिनीचा ‘ कंट्रोल सर्व्हे’ करण्यात यावा. संबंधित यंत्रणांनी जागेची पाहणी करून अहवाल द्यावा.

मंडणगड परिसरात एमआयडीसी झाल्यास येथील तरुणांना रोजगार मिळेल. या भागात उद्योगांसाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे. या एमआयडीसीचा अधिकाधिक विस्तार होण्यासाठी अतिरिक्त योग्य जमिनीचा शोध घ्यावा, असेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

Total Visitor Counter

2647924
Share This Article