रत्नागिरी: राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी आज सकाळीच रत्नागिरी दौऱ्यावर असताना करबुडे गावातील वादळामुळे बाधित झालेल्या भागाची तातडीने पाहणी केली. सकाळी 7 वाजताच पालकमंत्री सामंत यांनी घटनास्थळी पोहोचून थेट ग्रामस्थांशी संवाद साधला आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली.
अचानक आलेल्या वादळामुळे करबुडेतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची स्वतः पाहणी केल्यानंतर पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी नागरिकांना धीर दिला. यावेळी बोलताना त्यांनी अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले. ते म्हणाले की, “वादळग्रस्त नागरिकांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती सर्व शासकीय मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील.” पालकमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे पीडित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, गावकर तांबे, प्रविण पांचाळ, सरपंच संस्कृती पाचकुडे, शंकर सोनवडकर, मंगेश सोनवडकर, वैभव कळंबटे, मिलिंद खानविलकर, सचिन पाचकुडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी अत्यंत पहाटे येऊन पाहणी केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.