GRAMIN SEARCH BANNER

कोल्हापूरला लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम

Gramin Varta
120 Views

कोल्हापूर: कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील क्रिकेट प्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाला.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने या मागणीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले होते. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संभाजी राजे छत्रपती आणि आमदार अमल महाडिक यांनी शासनस्तरावर प्रयत्न केले. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तत्कालीन क्रीडा मंत्री यांच्याकडेही पत्रव्यवहार करून या प्रस्तावास पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

स्टेडियमासाठी करवीर तालुक्यातील विकासवाडी येथील 42१ हेक्टर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेतून 12 हेक्टर जमीन मंजूर करण्यात आली आहे. आमदार अमल महाडिक यांनी सांगितले की, लवकरच जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

याअंतर्गत कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील उदयोन्मुख खेळाडूंना मोठी संधी मिळणार आहे. स्टेडियममुळे कोल्हापूरचा क्रिकेट नकाशावर ठळक ठसा उमटेल आणि शहराच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासाला मोठा चालना मिळेल.

आमदार अमल महाडिक यांनी याबाबत म्हणाले, “कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले आणि यश आले. नियोजित स्टेडियम माझ्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात उभारण्यात येणार असून कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेला नवे आयाम मिळेल.”

Total Visitor Counter

3380017
Share This Article