गौतमी निलेश चव्हाण सर्वसामान्य घरातून उच्च शिक्षित उमेदवार
चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघातील कळवंडे जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने चिपळूण-भोम ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या व स्थानिक उमेदवार सौ. गौतमी निलेश चव्हाण (रा.भोम आदवडेवाडी) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. सौ. गौतमी निलेश चव्हाण या सर्वसामान्य घरातून उच्च शिक्षित सिव्हिल इंजिनियर डिप्लोमा केलेल्या तरुण उमेदवार आहेत.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आशीर्वादाने तसेच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या नेतृत्वाखाली हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य काणेकर मॅडम, माजी पंचायत समिती सभापती पांडुशेठ माळी, निलेश नामदेव चव्हाण, प्रविण चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक प्रश्नांची जाण असलेली व विकासाभिमुख उमेदवार म्हणून सौ. गौतमी चव्हाण यांच्या उमेदवारीकडे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक अपेक्षेने पाहिले जात आहे. तसेच यांच्या उमेदवारीने कळवंडे जि.प.गटातील चिपळूण खाडी पट्टा येथील सुशिक्षित तरुण व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद कळवंडे गटासाठी गौतमी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल





