GRAMIN SEARCH BANNER

काँग्रेस पक्षाच्या विरोधात भाजपची चिपळूणमध्ये जोरदार निदर्शने

Gramin Varta
119 Views

संसदेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना चहा बिस्किट पार्टीचे आयोजन केल्याचा निषेध

चिपळूण : चिपळूण शहर मंडलच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात शनिवारी (ता. १४) जोरदार निदर्शने करण्यात आली. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना संसदेच्या मकर प्रवेशद्वाराबाहेर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस व अन्य विरोधी पक्षातील खासदारांनी चहा-बिस्कीट पार्टीचे आयोजन करणे अत्यंत खेदजनक व आक्षेपार्ह आहे, अशा शब्दांत टीका करून भाजपने काँग्रेससह विरोधकांचा निषेध केला. कापसाळ येथील बाळासाहेब माटे सभागृहाच्या बाहेर दुपारी साडेतीन वाजता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, वंदे मातरम्`, काँग्रेस पार्टीचा निषेध असो` अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा परिषद सदस्य सौ. रावी मोरे, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण यांच्या उपस्थित ही निदर्शने करण्यात आली.

यावेळी शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, रत्नागिरी उत्तरचे जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, जिल्हा चिटणीस अनिल सावर्डेकर, समीर टाकळे, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, शहर सरचिटणीस सारिका भावे, महिला मोर्चा शहराध्यक्ष रसिका देवळेकर, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, युवा शहराध्यक्ष व चिपळूण पालिकेचे आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक, संदीप भिसे, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेविका अंजली कदम, संयोजक आशिष खातू, रत्नदीप देवळेकर, मधुकर निमकर, निनाद आवटे, जतिन घटे, संदेश ओक, रत्नागिरी दक्षिण जिल्हा सदस्य स्वाती देवळेकर, जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य अभय चितळे, रुही खेडेकर, सपना भिसे, मृणाल घटे, शक्तीकुमार चव्हाण, कुणाल आंबेकर, दिनेश लटके, नरेंद्र बेलवलकर, अवनी निमकर, ज्योती देसाई, पूजा कदम, नेहा शितप, नीता कपडेकर, अमोल तटकरे, महेंद्र भालेकर, , सचिन कांबळी, निखिल किल्लेकर, संदेश मोहन ओक, रुपेश प्रकाश आवले, अनिल लांजेकर, विनय दाते आदी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3344952
Share This Article