GRAMIN SEARCH BANNER

ओरी येथे कोळसावाहू ट्रक पलटी; सुदैवाने चालक बचावला

समीर शिगवण / रत्नागिरी
निवळी-जयगड मार्गावरील ओरी येथे शुक्रवारी रात्री कोळसावाहू ट्रकला अपघात झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी चालक सुदैवाने बचावला.

मिळालेल्या माहितीनुसार, ओरी मधलीवाडी परिसरात गेले काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असून वाहन बंद पडणे, अपघात होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. शुक्रवारी रात्री जयगडहून कर्नाटकला कोळसा घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक – के ए 48 ए 1401) मधलीवाडी येथील अवघड वळणावर आला असता समोरील वाहनाने अचानक हुलकावणी दिली. त्यातून ट्रक बाहेर काढण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला.

अपघातानंतर चालकाने थोडक्यात जीव वाचवला. ट्रकमध्ये पाच टन कोळसा होता. अपघातानंतर हा कोळसा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ट्रकमधून सुरक्षितपणे मार्गस्थ करण्यात आला

Total Visitor Counter

2474795
Share This Article