चिपळूण : तालुक्यातील जांभळी नदीत ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.
भिले येथील निर्मला नारायण गुरव (वय ७६) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्या नदीच्या पात्रात उताणी अवस्थेत तरंगताना दिसल्या. नातेवाईक महेश रघुनाथ गुरव यांनी त्यांना तातडीने कामथे रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
चिपळूण : जांभळी नदीत वृद्ध महिला बुडून मृत
