मुंबई : पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा जोरदार मारा होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान खात्याचा इशारा धोक्याची घंटा ठरू शकतो. मुसळधार पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहण्याची, रस्ते वसाहती जलमय होण्याची, वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे.
प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्याचा दावा केला असला तरी अचानक मुसळधार पावसाचा फटका बसल्यास जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, किनाऱ्यावर व नदीनाल्यांच्या काठावर जाणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा जोर वाढल्यास काही भागांत तालुक्यातील नद्यांमध्ये पुरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते.
मुंबईसह कोकणात रेड अलर्ट ; पुढील 3 – 4 तासांत मुसळधार पावसाचा इशारा!
