GRAMIN SEARCH BANNER

खडसेंच्या जावयाला क्लीन चीट; खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण

Gramin Varta
83 Views

पुणे : शहरातील खराडी येथे झालेल्या कथित ड्रग्स पार्टी प्रकरणात एक मोठे आणि निर्णायक वळण आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींनी ड्रग्सचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्टीवर धाड टाकण्यापूर्वी आरोपींनी ड्रग्सचे सेवन केले नव्हते. या प्रकरणात अटक झालेल्या सर्व आरोपींची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे रिपोर्ट पोलिसांना काही दिवसांपूर्वी मिळाले असून, ते न्यायालयातही सादर करण्यात आले आहेत.

या प्रकरणी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाल्यानंतर अखेर तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात असलेले प्रांजल खेवलकर यांची येरवडा जेलमधून सुटका झाली आहे. फॉरेन्सिक अहवालामुळे आता या प्रकरणाची पुढील दिशा आणि कायदेशीर कार्यवाही कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

2652792
Share This Article