संगमेश्वर: महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.१३/१०/२०२५ रोजी एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल डेरवण, तालुका चिपळूण ,जिल्हा रत्नागिरी याठिकाणी १९ वर्ष वयोगट विभागस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर स्पर्धेमध्ये संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी कसबा संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कसबा संगमेश्वर या विद्यालयातील १९ वर्ष वयोगट विद्यार्थ्यांच्या संघाने रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व केले.
सदर स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या संघाने अभूतपूर्व खेळाचे प्रदर्शन करत अटीतटीच्या सामन्यात विभागस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून खो-खो खेळतील आपले कौशल्य सिध्द केले.
खो-खो संघातील यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष श्री. नियाज कापडी, उपाध्यक्ष श्री. इब्राहिम काझी, सचिव श्री. सईद उपाद्ये, सहसचिव श्री. शौकतअल्ली खलफे, खजिनदार श्री. शिकुर गैबी, सर्व सदस्य, प्राचार्य श्री. एच.जी शेख, पर्यवेक्षक श्री. एस.ए. पटेल, मार्गदर्शक शिक्षक श्री.एन.एस.बाणदार, श्री.पी.जी. पडवळ, श्री.यु.टी. गावडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कोल्हापूर विभागीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत कसबा हायस्कूलचे विद्यार्थी तृतीय क्रमांकाचे मानकरी
