GRAMIN SEARCH BANNER

सिंधुरत्न समृद्धी योजनेतून चिपळूण तालुक्यातील लाभार्थ्यांना दुधाळ गायी-म्हशी व शेळी गट अनुदान धनादेश वाटप

आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

चिपळूण : सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत चिपळूण तालुक्यातील लाभार्थ्यांना 2 दुधाळ गायी-म्हशींचे गट वाटप आणि शेळी गट अनुदानाचे धनादेश वाटप कार्यक्रम सावर्डे (ता. चिपळूण) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात आले. हा उपक्रम पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या वेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत गायी-म्हशींच्या योग्य निगा राखून उत्पन्नवाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी अधिक प्रयत्न करावेत, असे सांगितले.

या योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांमध्ये सुधीर सावर्डेकर (असुर्डे), शरयु सावर्डेकर (रामपूर), चैतन्य मयेकर (कुटरे), संदीप राजेशिर्के (कुटरे), बाबाराम जाधव (दळवटणे), आणि शाबीरा पटाईत (कान्हे) यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. सोनावळे (उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, चिपळूण), डॉ. काणसे (पशुधन विकास अधिकारी), प्रमोद केळसकर (सहाय्यक गटविकास अधिकारी, चिपळूण), डॉ. बारापत्रे, डॉ. बाळाजी डोंगरे, डॉ. पेढांबकर, डॉ. होणराव, शौकत माखजनकर, विजय भुवड आदी मान्यवर उपस्थित होते.

Total Visitor Counter

2475082
Share This Article