तीन महिन्यांपासून पोषण आहाराचे साहित्य गायब; दुकानदारही उधारीला ‘नाही’ म्हणू लागले
राजापूर : शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा या उद्देशाने शासनाने मोफत पोषण आहार योजना राबवली असली, तरी राजापूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून शाळांना पोषण आहाराचे साहित्यच मिळालेले नाही. त्यामुळे शाळा प्रशासन आणि शिक्षक उधारीवर साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवत आहेत. मात्र, उधारीचा बोजा वाढत असल्याने दुकानदारही आता उधारीवर साहित्य देण्यास नकार देऊ लागले आहेत.
एप्रिल महिन्यापासून शिजवून दिल्या जाणाऱ्या आहारासाठी लागणारे धान्य वा इतर साहित्य शासनाकडून शाळांना मिळालेले नाही. त्यामुळे शाळांमध्ये पोषण आहार देण्याची जबाबदारी शिक्षकांवर पडली असून, उधारीवर खरेदी केल्यामुळे त्यांची आर्थिक अडचण वाढत आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी शाळा व्यवस्थापनाकडून केली जात आहे.
राजापुरात शालेय पोषण आहार बंद; शिक्षकांकडून उधारी उसनवारीवर विद्यार्थ्यांना जेवण
