GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात शिंदे सेनेकडून तरुण उमेदवाराला पसंती ; साजिया काझीना नगराध्यक्षपदासाठी वाढती मागणी

Gramin Varta
828 Views

भाजप आणि अजित पवार गटाचा पाठिंबा – काझी

राजापूर :राजापूर नगर परिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळी सुरू होताच शहरात संभाव्य उमेदवारांच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा उमेदवारांकडे लागल्या आहेत. यातच आता राजापुरात एकच नाव चर्चिल जात आहे. ते म्हणजे तरुण महिला नेतृत्व साजिया हनीफ काझी.

विशेषतः नगराध्यक्षपदासाठी तरुण आणि शिक्षित उमेदवार साजिया हनीफ काझी यांचे नाव सध्या राजकीय वर्तुळात गाजत आहे. या दृष्टीने राजापुरात त्यांना चांगली पसंती असल्याचे बोलले जात आहे. सुशिक्षित उमेदवार आणि नवा चेहरा असल्याने लोकांनी पसंती दर्शवली आहे. साजिया काझी नगराध्यक्ष झाल्यास तरुणासाठी आणि राजापूरला दिशा देण्याचे काम करतील असे जाणकारांकडून बोलले जात आहे.

साजिया काझी यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर YCMOU मधून बी.ए. पदवी मिळवली आहे. त्यांना वडील माजी नगराध्यक्ष हनीफ मुसा काझी यांचे राजकीय मार्गदर्शन लाभत आहे. हनीफ काझी हे गेल्या 20 वर्षांपासून राजापूर अर्बन बँकेचे संचालक असून, त्यांनी राजापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजात आणि तळागाळातील मतदारांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असल्यामुळे, शिंदे गटाकडून साजिया काझी यांना धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत विचारणा केली असता हनीफ काझी म्हणाले,

“पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण (भैया) सामंत यांचे आमच्यावर नेहमीच आशीर्वाद आहेत. तिकीट मिळाल्यास साजिया ही संधीचे सोने करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

2016 मधील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार रवींद्र बावधनकर यांना 722 मते मिळाली होती, तर पोटनिवडणुकीत गोविंद चव्हाण यांना 422 मते मिळाली. शहरातील काही प्रभाग सोडले तर भाजपची ताकद मर्यादित असल्याने, शिंदे गटाच्या उमेदवाराला आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजापूरातील मतदारसंघातील वातावरण पाहता, महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि अजित पवार गट यांच्या संयुक्त पाठिंब्यामुळे “महायुतीचं सरकार राजापूरात येणार, यात शंका नाही”, असे हनीफ काझी यांनी ठामपणे सांगितले.

Total Visitor Counter

3374638
Share This Article