GRAMIN SEARCH BANNER

साखरपा येथे सेंट्रींगचे काम करणाऱ्या तरुणाकडून विषारी द्रव प्राशन

Gramin Varta
146 Views

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे सेंट्रींगचे काम करणाऱ्या बिहार राज्यातील एका तरुणाने मद्याच्या नशेत उंदीर मारण्याचे विषारी द्रव प्राशन केल्याची घटना बुधवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

ब्रीजेश बुटी चौधरी (वय २८, सध्या रा. साखरपा, ता. संगमेश्वर, मूळ रा. जि. शिवान, राज्य बिहार) असे या तरुणाचे नाव आहे. विषारी द्रव प्राशन केल्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तत्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3378809
Share This Article