रत्नागिरी: जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनमार्फत आयोजित जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी स्पर्धेत यश भोंगले, नेहा मुळ्ये आणि वल्लरी देवस्थळी यांनी विविध तीन गटांचे विजेतेपद मिळवत हॅट्ट्रिक साधली आहे.
सर्वंकष विद्यामंदिरच्या बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या या स्पर्धेसाठी रायसोनी स्पोर्ट्स फाउंडेशनने साह्य केले होते. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी रायसोनी यांच्याशी संवाद साधला होता. या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे १३० खेळाडू सहभागी झाले होते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष ओंकार हजारे, वस्तू व सेवाकर कमिशनर विकास पोवार, अमित मुळ्ये, सरोज सावंत, राजेश आराध्यमठ, मंगेश प्रभुदेसाई, रजनीश महागावकर, विनीत पाटील, सुधीर बाष्टे आदी उपस्थित होते. स्पर्धेतून रत्नागिरी जिल्हा संघांची निवड करण्यात येणार आहे. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस, चषक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा – ४० वर्षांवरील दुहेरी निशिकांत मेहंदळे- संदेश कलगुटकर (विजयी) दिनेश जैन-निनाद लुब्री (उपविजयी).
१९ वर्षांखालील मुली- नेहा मुळ्ये, आर्या यशवंतराव.
१९ वर्षाखालील मुलगे- यश भोंगले, स्वयम पानवलकर.
१७ वर्षांखालील मुली – नेहा मुळ्ये, आर्या यशवंतराव.
१७ वर्षांखालील मुलगे- यश भोंगले, सुमेध सुर्वे.
१५ वर्षांखालील मुली – वल्लरी देवस्थळी, रिया पेढांबकर.
१५ वर्षांखालील मुलगे – अंश ढेकणे, पार्थ आपटे.
१३ वर्षांखालील मुली – वल्लरी देवस्थळी, विश्वास गमरे.
१३ वर्षांखालील मुलगे – आदित्य घाणेकर, अनय भोजने.
११ वर्षांखालील मुली – वल्लरी देवस्थळी, स्वरा खेडेकर.
११ वर्षांखालील मुलगे – लवीन चोचे, अभिराज पवार.
पुरुष दुहेरी – रोमित कलगुटकर- रुद्रा सदावर्ते, सिद्धेश फणसेकर-यश सावर्डेकर.
महिला एकेरी – नेहा मुळ्ये, ऐश्वर्या मोहिते.
पुरुष एकेरी– यश भोंगले, सिद्धार्थ मोहिते.
रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत यश भोंगले, नेहा मुळ्ये, वल्लरी देवस्थळी विजयी
