खेड: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा खेडची कार्यकारिणी सभा नुकतीच तालुका स्कूल खेड येथे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
सभेच्या सुरुवातीला तालुका सचिव धर्मपाल तांबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. येत्या १३ जुलै २०२५ रोजी गुणवंत शिक्षक पाल्य आणि गुणवंत शिक्षक गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या सोहळ्यात दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या शिक्षक पाल्यांचा तसेच आदर्श शिक्षकांचा सत्कार केला जाणार आहे. हा गुणगौरव समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी यावेळी केले.
या महत्त्वपूर्ण सभेला तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, पतपेढी संचालक सुनील दळवी, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, उपाध्यक्ष बबन साळवी, पतपेढीचे माजी चेअरमन सुनील सावंत, प्रसिद्धी प्रमुख शैलेश पराडकर, दिलीप यादव, तुकाराम काताळे, संतोष मोरे, एडु केकान, निलेश कांदेकर, नारायण शिरकर, दीपक कांबळे, संजय गडाळे, दिनेश पवार, भाऊसाहेब कांबळे, दिलीप कडू, विजय कासार, भरत बोडके, गजानन पालांडे, मंगेश वायकर यांच्यासह समितीचे अन्य अनेक सदस्य उपस्थित होते. या सभेमुळे शिक्षकांमध्ये एक नवा उत्साह संचारल्याचे दिसून आले.