खेर्डी ग्रामपंचायतीला कायदेशीर कारवाईसाठी दिले निवेदन
चिपळूण : तालुक्यातील एक प्रतिष्ठेची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेर्डी ग्रामपंचायत क्षेत्रात राहणारा अशरफ मोहम्मद बेबल या इसमाने एका हिंदू महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत केलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे चिपळूण येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधीं मध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. गोतस्करीच्या घटनांन मध्ये याच भागातील समाजकंटकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. मधल्या काळात बांगलादेशी घुसखोर येथे सापडले आहेत. त्यांना रहिवासी दाखले दिल्याचे उघड झाले आहेत.
खेर्डी ग्रामपंचायत जिल्ह्यातील एक प्रतिष्ठेची असल्याने तिच्या नावलौकिकाला गालबोट या समाजकंटकांमुळे लागत आहे. एक स्वायत्त संस्था म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाकडुन पोलीस यंत्रणेला ही संबंधतांवर कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र देण्यात यावे, असे चिपळूण येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आज निवेदन देताना सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. सुगंधा सुभाष माळी आणि उप सरपंच शुभम जयंद्रथ खताते यांनी हे निवेदन स्विकारले. तसेच या गंभीर घटना असून पोलीस यंत्रणेला याविषयी पत्र ही देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत याबद्दल आम्ही निश्चित चर्चा करणार आहोत, असे उप सरपंच शुभम खताते यांनी सांगितले. निवेदन देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजिंक्य ओतारी, रमेश टोणे, शिवसेनेचे गुहागर विधानसभा निरीक्षक अनुराग उतेकर, प्रशांत उतेकर, युवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष आदित्य जोशी, गोरक्षक विक्रम जोशी, पेढांबे येथील हिंदुत्वनिष्ठ जयवंत शिंदे, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत चाळके, शशिकांत मोरे आदी उपस्थित होते.
खेर्डी येथे हिंदू महिलेला झालेल्या मारहाणीबद्दल हिंदू संघटना संतप्त

Leave a Comment