रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील पानवल गौतमनगर येथे सार्वजनिक रस्ता दगड टाकून बंद केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीष विलास मुळ्ये (रा. पानवल, रत्नागिरी) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी तनिष्का भाग्यवान होरंबे (26, रा. पानवल, होरंबेवाडी) यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, 7 जुलै रोजी सकाळी गिरीष मुळ्ये याने सार्वजनिक रस्त्यावर दगड टाकून रस्ता बंद केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी गिरीष मुळ्येविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 126(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक रस्ता अडवल्यामुळे स्थानिक नागरिकांना झालेल्या त्रासानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.