लांजा : तालुक्यातील गोविल येथे पार पडलेल्या चिखल नांगर स्पर्धेत व्हेळ गावाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
व्हेळ गावचे सुपुत्र, माजी सरपंच मा. प्रकाश तानू रामाणे यांचे चिरंजीव मा. विनायक प्रकाश रामाणे (रा. व्हेळ, ता. लांजा) यांनी त्यांच्या बैलजोडीच्या माध्यमातून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.”स्पीड किंग बादल व सोन्या” या जोडीने आपला वेग, तडफदार दौड आणि ताल धरत स्पर्धेतील प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे व्हेळ गावाचे नाव उज्वल झाले आहे.
या विजयानंतर आयोजक आणि उपस्थितांचा उत्साह शिगेला पोहोचला. स्पर्धेसाठी विशेषतः मुंबईहून आलेले, रामाणे कुटुंबाचे सदस्य पोलिस अभिषेक रामाणे आणि “बादल-सोन्या”चे प्रेमी, संस्थापक जॅकी, तसेच बैलगाडा स्पर्धेचे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गौरवशाली क्षणी रामाणे कुटुंबाच्यावतीने सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
लांजातील नांगरणी स्पर्धेत व्हेळच्या बैलजोडीचा प्रथम क्रमांक!
