GRAMIN SEARCH BANNER

गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची विक्रमी गर्दी

Gramin Varta
7 Views

रत्नागिरी, प्रतिनिधी : पवित्र श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग जुळून आल्याने रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात मंगळवारी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. श्रावण महिन्यातील या विशेष योगामुळे भाविकांसाठी ही दुहेरी पर्वणी ठरली. घाटमाथ्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी गणपतीपुळे येथे हजेरी लावली आहे.

मंगळवारी पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभर दर्शनासाठी गर्दी कायम होती. मंदिर समितीने दिलेल्या अंदाजानुसार, दिवसभरात सुमारे ३० ते ४० हजार भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. भाविकांना सहज दर्शन घेता यावे यासाठी रात्री साडेदहा वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे.

या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर समिती आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे सज्ज होते. सुरक्षित आणि सुलभ दर्शनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या विशेष दिवशी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुले आणि फळांची सुंदर सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आनंदाला चार चाँद लागले.

Total Visitor Counter

2649063
Share This Article