खेड : जादूटोणाच्या संशयावरून एका महिलेशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना खेड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या तिघांच्या वतीने अॅड. सुधीर बुटाला यांनी बाजू मांडली.
तौसिफ नरूद्दीन सारंग, शहवाज जमालुद्दीन तांबे आणि आमना तौसिफ सारंग अशी संशयितांची नावे आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला होता. जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने सर्व मुद्दे मांडल्यानंतर न्यायालयाने तिघांनाही सशर्त जामीन मंजूर केला.
जादूटोणा संशयावरून महिलेशी विनयभंग प्रकरणातील तिघांना जामीन
