GRAMIN SEARCH BANNER

लक्ष-लक्ष दिव्याचे रोषणाईने झळाळून निघाला स्वामी गगनगिरी महाराजांचा निसर्गरम्य मनोरी आश्रम!

Gramin Varta
89 Views

हजारो भाविक भक्तांचे चैतन्यदायी उपस्थितीत गगनगिरी दर्शन सोहळा संपन्न!

मालाड : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  विश्व योगीराज श्रीनाथ गगनगिरी महाराज यांच्या प्रेरणा आशीर्वादाने मनोरी आश्रम स्थानी दर्शन सोहळा सप्ताह व अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी व विश्वशांतीसाठी आयोजित केलेला लक्षदीप सोहळा हा कार्यक्रम मुंबई जवळील मालाड उपनगरापाशी असलेल्या मनोरी येथील प्रसिद्ध गगनगिरी आश्रमात असंख्य भाविक भक्तांचे चैतन्यदायी उपस्थितीत अतिशय श्रध्दा-प्रेम-भक्तीभावाने संपन्न झाला.

सतत ७ दिवस साजरा होत असलेल्या या धार्मिक सोहळ्यास  विजयादशमीच्या दिना पासून  प्रारंभ झाला असून या धार्मिक सोहळ्याची बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी काल्याचे कीर्तनाने सांगता झाली.
*     
सदर धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने आश्रमस्थानी दररोज काकडआरती हरिपाठ, पारायण ,होमहवन -भंडारा  तसेच अनेक  मान्यवर कीर्तनकारांची  कीर्तने,भजने,प्रवचने, कथा निरूपण आदी कार्यक्रमा बरोबर जागरगोंधळ नवचंडी याग, तसेच 56 भोग नैवेद्य अर्पण सोहळा असंख्या भाविकांचे उपस्थितीत संपन्न झाले.

या उत्सवाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध शाहीर रूपचंद चव्हाण यांचे शाहिरी व भक्ती गीते कार्यक्रम पार पडला  तसेच श्री गुरु सप्तशती चे सामुहिक पारायण संपन्न झाले,यावेळेस
कोजागिरी पौर्णिमेला लक्ष-लक्ष दीप प्रज्वलित करून स्वामी गगनगिरी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी स्वामी गगनगिरी महाराजांचे ओणीआश्रम प्रमुख
नाथयोगी उल्हासगिरी महाराज व  गगनगड आश्रमाचे  बापूसाहेब पाटणकर हे खास उपस्थित होते.

या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्वामीगगनगिरी महाराजांनी आपले हयातीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने सुरू केलेला भव्य दिव्य लक्ष-लक्ष दीपसोहळा महोत्सव.यंदाचे हे २५ वे वर्ष असून,या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने भाविक भक्तांमध्ये  प्रचंड उत्साह व आनंदी वातावरण पहावयास मिळाले.आजही महाराजांच्या कृपाशिर्वादाने हा लक्ष लक्ष दीप महोत्सव अव्याहत सुरू असून यावेळेस सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता,हजारो मुंबई करांचे वैभवशाली उपस्थितीत तसेच विविध आश्रमातील संत-साधू-भक्तमंडळींचे चैतन्यदायी उपस्थितीत सदरहू चैतन्यमय सोहळा मोठ्या दिमाखात वआनंदात संपन्न झाला.आश्रमातील सर्व झाडाचे सभोवती असलेल्या गोलाकार कट्यावर असंख्य पणत्या व्यवस्थित मांडून प्रज्वलित करण्यांत आल्या.पणत्याच्या सुरेख मांडणीतून एक नयनरम्य देखावा बघण्यास मिळत होता.संपूर्ण आश्रम परिसर लक्ष-लक्ष दीप प्रज्वलित केल्याने या नयनरम्य प्रकाशाने झळाळून निघालेला पहावयास मिळाला.

सदर दर्शन-सोहळा कार्यक्रमास  तसेच लक्ष-लक्ष दीप महोत्सवात हजारो भाविक भक्तांनी उपस्थित राहून सक्रिय सहकार्य केल्याबद्दल मनोरीआश्रम चे प्रमुख श्री.निषादजी अमृतराव पाटणकर यांनी सर्व उपस्थित भाविक भक्तांचे व सेवेकरी मंडळीचे आभार मानले!

Total Visitor Counter

2648021
Share This Article