GRAMIN SEARCH BANNER

न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल, आंबेड येथे कारगिल विजय दिन साजरा

संगमेश्वर : “शौर्य आणि समर्पणाची स्मृती”हा दृष्टीकोन समोर ठेऊन आज न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल, आंबेड येथे कारगिल विजय दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. भारतीय सैनिकांच्या पराक्रमाला वंदन करत शाळेने हा दिवस उत्साहात साजरा केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्याध्यापिका सुजेन अल्जी यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेमाचे महत्त्व समजावून सांगितले आणि कारगिलच्या लढ्याची स्मृती ताजी केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांना समर्पित “जवानांना पत्र” या उपक्रमातून त्यांच्या शौर्याला वंदन केले. प्रत्येक पत्रातील भावना हृदयस्पर्शी होत्या. या भावनेतून विद्यार्थ्यांनी आपल देशाप्रती प्रेम, आदर या पत्रांतून व्यक्त केला.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नाझिमा बांगी यांनी उपस्थितांना संबोधित केले. कारगिल युद्धातील विजय केवळ एक सैनिक सफलता नसून, संपूर्ण देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. आपल्या जवानांनी दाखवलेली शौर्यगाथा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी देशाच्या एकात्मतेचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना द्विगुणित झाली आणि शहीद जवानांच्या बलिदानाला मानाची परंपरा पुढे नेण्याचा संदेश दिला.

Total Visitor Counter

2455626
Share This Article