मंडणगड : तालुक्यातील वेसवी येथील श्री काळंबा देवी संस्थानच्या मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवस्थानचे पुजारी योगेश खाडे यांनी बाणकोट सागरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून २१ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत मंदिरात कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंदिरातील दानपेटी चोरून नेली. या दानपेटीत सुमारे १५ हजार रुपयांची रक्कम असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.






